vitthal kangane: ऑनलाइन परीक्षा बंद करा

छत्रपती संभाजी नगर :

 

vitthal kangane
vitthal kangane

 

स्पर्धा परीक्षा मार्फत भरण्यात येणाऱ्या विविध भरती प्रक्रियेत होणाऱ्या घोटाळ्या विरोधात नुकताच छत्रपती संभाजी नगर येथे vitthal kangane सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा परिसरात मोर्चा काढण्यात आला.
यावेळी स्पर्धा परीक्षा करणारे असंख्य विध्यार्थी उपस्थित होते.
राज्यभरातील लाखो विद्यार्थी या मोर्चात सामील झाले होते. विशेषतः परभणी, नांदेड, बीड ,जालना, छत्रपती संभाजी नगर ,लातूर ,धाराशीव तसेच विदर्भातील असंख्य विध्यार्थी या मोर्चाला उपस्थित होते.
वाढती बेरोजगारी ,नापिकी अणि भरती प्रक्रियेतील अनियमितता या अणि अश्या विविध कारणाने विद्यार्थ्याचा आक्रोश यावेळी दिसून आला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य सरकारला यावेळी निवेदन देऊन दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी vitthal kangane sir यांनी केली

vitthal kangane सर – जमीर की लढाई मे आमंत्रण नहीं दिये जाते

“मला पोरांनी मोठ केलाय मी त्यांच्यासाठीच रस्त्यावर उतरलो” असे मत vitthal kangane sir यांनी व्यक्त करत “मी नेहमीच पोरांसाठी त्याच्या न्याय व हक्कासाठी पुढे असणार आहे असे विधान त्यांनी विध्यार्थ्यांना संबोधताना संगितले .

गरीब घरातील पोरगं 10 -10 तास अभ्यास करताय लहान भाऊ कुठे तरी काम करतोय बहिणीच लग्न राहील आहे अशातच 1000 रु फीस भरून मुलगा परीक्षेला जातोय आणि घोटाळे करणारे 20-25 लाख रुपयात पोस्ट मिळवत आहे . हा अन्याय कुठवर सहन करायचा असे परखड मत vitthal kangane sir यांनी व्यक्त केले .

video credit : maharashtra Times youtube channel

तसेच विविध स्पर्धा परीक्षा केंद्र चालवणार्‍या संस्थांवर नाव न घेता

” जमीर की लढाई मे आमंत्रण नहीं दिये जाते जिसका ज़मीर ज़िन्दा होता है वो खुद चले आते है” असा टोला वजा इशारा त्यांनी लगावला .

vitthal kangane यांनी काढला होता कंत्राटी भरती जी आर विरोधात मोर्चा

स्पर्धा परीक्षेतील पहिला मोर्चा vitthal kangane सर यांनी मागील काही दिवसापूर्वी काढला होता .

त्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी कंत्राटी भरती जी आर विरोधात आंदोलन करण्यात आले होते.

त्यानंतर वाढता विरोध लक्षात घेता राज्य सरकारने कंत्राटी भरती जी आर तूर्तास मागे घेऊन विध्यर्थ्यांना दिलासा दिला होता .

vitthal kangane सरांचा सोशल मीडिया वर मोठा परिवार आहे . instagram वरती सरांचे 828 k पेक्षा जास्त follower आहेत .

 

मागण्या काय आहे.
  • .घोटाळेबाज दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.
  • घोटाळ्यात आढलेल्या उमेदवारला आजीवन बंदी घालण्यात यावी.
  • तलाठी भरतीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी राज्य सरकार मार्फत करण्यात यावी.
  • परीक्षा फीस कमी करण्यात यावी.

    अश्या इतर मागण्या या वेळी ठेवण्यात आल्या .तसेच राज्य सरकारने ठराविक कंपनीकडून घेण्यात येणार्‍या ऑनलाईन परीक्षा घेऊ नये .

त्या परीक्षा  एमपीएससी मार्फत घ्याव्यात अशी मागणी एकमुखाने कऱण्यात आली.
वाढती महागाई अणि त्या अनुषंगाने वाढणारी स्पर्धा परीक्षा फीस याकडेही मोर्चात लक्ष वेधून घेतले गेले.
यावेळी विवीध मान्यवरांनी हजेरी लावत आपले मनोगत व्यक्त केले.
विध्यार्थी यांनीही आपले मनोगत सरकारपुढे या मोर्चाच्या माध्यमातून माडले.

तलाठी, वनरक्षक ,जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग ,नगर परिषद तसेच इतर विभागातील ऑनलाइन भरती प्रक्रियेत होत असलेल्या घोटाळ्याबाबत हा मोर्चा काढण्यात आला होता .

राज्य सरकार कडून या बाबतीत कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही  आणि त्यामुळे याबद्दल  विध्यर्थ्यांनी नाराजी व्यक्त करत सरकारवर रोष दर्शविला .

 

also read

talathi bharti 2023:तलाठी भरती निकाल जाहीर !

 

Leave a Comment

ram mandir pranpratishta ram mandir ayodhya
ram mandir pranpratishta ram mandir ayodhya