small Business Idea:घरगुती मसाला बिझनेस आयडिया

small business idea :मसाला बिझनेस आयडिया 

 

small business idea
small business idea

भारत देश हा विविध धर्म , रूप , रंग मध्ये सामावून गेलेला आहे.आपल्या देशात भिन्न भिन्न लोक हे वेगवेगळी रूपरेषा घेऊन फिरत असतात .प्रत्त्येक ठिकाणी जिल्ह्यात गावात शहरात स्वतःची त्या गावाने निर्माण केलेली अशी ओळख आहे . मग ते कपडे असोत , तिथली भाषा असो किंवा खाद्यपदार्थ असो. आपल्या भारत देशा मध्ये , प्रत्येक जिल्ह्या मध्ये अश्या इत्यादी घटकांमध्ये विविधता आढळून येते

प्रत्येक खाद्यपदार्थ मध्ये तिथल्या विशेषतः नुसार आणि चवीनुसार मसाले हे वापरले जातात , त्याचे प्रमाण ठरविले जाते.मसाले हा खाद्यपदार्थ मधील एक महत्वपूर्ण घटक आहे .मसाल्यांदा उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणावर चालू शकतो फक्त त्याचा नीट अभ्यास करायला हवा . आज आपण ह्या लेखात मसाल्यांचा उद्योग सुरु करताना विविध कल्पना चा अभ्यास केला पाहिजे. ते आपण ह्या लेखात पाहू.

जर कोणी मसाल्यांचा उद्योग / व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.आताच्या ह्या धावपळीच्या जगात आपल्याला आधीसारखा वेळ काढून बऱ्याच गोष्टी करता येत नाही.

उन्हाळा म्हंटलं की वळवणीचे पदार्थ जसे  कि पापड , लोणचे , कुरडई , सांडगी इत्यादी  बनवणे . त्यातच महत्वाचं पदार्थ म्हणजे वर्षभरासाठी लागणारे  मसाले ज्याला आपण इंग्रजी मध्ये spices  म्हणतो .

मसाल्यात  विविध प्रकार आहेत  लाल तिखट , हळद , गोडा मसाला , काळा मसाला , गरम मसाला , कांदा लसूण मसाला इत्यादी इत्यादी.जितकी नाव घ्याल तितकी कमी आहेत आणि प्रत्येकाची चवही वेगळीच असते .

पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या आजी. आई च्या पिढीच्या वेळी हे मसाले हाताने जात्यावर दळत असत.

त्याची चव  काही वेगळीच असायची.काळ जसा जसा बदलत गेला परंतु घरगुती मसाल्याचे महत्व आणि मागणी कालानुरूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आणि हे एक मोठे कारण आहे की स्त्रिया घर सांभाळून नौकरी करून सुद्धा घरगुती मसाला व्यवसायात उतरत आहेत आणि यशस्वी सुद्धा होत आहे .

भारत सरकार ने महिला बचत गटांना विविध प्रकारे अर्थ सहाय्य देऊन महिलांचे साक्षमीकरण केले आहे .

नोकरी करत त्यांना हे बाकी गोष्टी करायला वेळ पुरत नाही म्हणूनच बऱ्याच स्त्रियांना हे सगळे मसाले बाहेर विकत घेण्यापेक्षा घरगुती चवीचे कोण मसाले बनवत असेल तर त्यांच्याकडून हे आवडीचे मसाले घेणे जास्त सोयीस्कर वाटत . ह्या मसाल्यांची मागणी हि फक्त शहरी भागापुरतं मर्यादित नसून , ग्रामीण भागात देखील मसाल्यांची मागणी हि मोठ्या प्रमाणावर आहे . ह्या वाढत्या मागणीवरूनच मसाल्यांचा उद्योग हा मोठ्या प्रमाणावर नफा देणारा व्यवसाय / उद्योग म्हणून समजले जाते.

आपण आता मसाला उद्योगाची प्रस्तावना बघू :

मसाला उद्योग हा  एक पाककृती चा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. ज्या मध्ये विविध प्रकारचे मसाले बनविले जातात . यासाठी  आपल्याला सगळ्या किंवा महत्वाच्या  मसाल्याची नावाची ओळख असने  अत्यंत आवश्यक आहे . त्याचबरोबर मसाला उद्योग ही  एक प्रक्रिया आहे जिथं विविध प्रकारचे मसाले , मसाला पावडर , मसाल्याचे व्यवस्थापन , मसाल्याचे उत्पादन आणि वितरण  इत्यादी सर्व प्रक्रिया या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे.

 

small business idea :मसाला उत्पादन व्यवसाय नोंदणी प्रक्रिया :

मसाला उत्पादन व्यवसाय हा लहान असो किंवा मोठा व्यवसाय करताना त्याची नोंदणी करण हे बंधनकारक आहे .नोंदणी प्रक्रिया  राज्य किंवा त्या त्या शहरानुसार वेगळी असू शकते . सुरुवातीला अपल्याला हवं असल्यास आपण एक व्यक्तीपासून व्यवसायची नोंदणी करू शकतो . स्थानिक भारतीय अन्नसुरक्षा आणि  मानक प्राधिकरण ह्यांच्याकडे करावी लागते व नंतर त्यांच्याकडून फूड लायसन्स मिळते . त्यानंतर तुम्हाला उद्योग आधार देखील नोंदणी करावा लागतो व व्यवसायाचा परवाना काढावा लागतो . दुसरे महत्वाचे म्हणजे बीआयएस प्रमाणपत्र परवाना देखील लागतो.

मसाला उद्योग उभारताना आपण पुढील काही मुद्दे लक्षात घेऊन काम चालू करू शकतो :

  • भांडवल
  • सामग्री खरेदी [ जागा / मशीन इत्यादी ]
  • सामग्री खरेदी [ मसाला संम्बधित कच्चा माल ]
  • मसाला उत्पादन ची गुणवत्ता तपासणीची सोय (quality control)
  • मसाला पँकिंग साहित्य( packeing)
  • मार्केटिंग करणे( marketing)
  • ग्राहक सेवा (customer service outlet)

सर्व  महत्वाचे उद्दिष्ट्ये आपण म्हणू शकतो या सर्व गोष्टीचा विचार आपण मसाला उद्योग सुरु करण्याआधी करायला हवा.

मसाला उत्पादन व्यवसाय चालू करण्याआधी काही गोष्टी माहिती  असल्या पाहिजे :
  1. आपण ज्या भागात [ ठिकाण ] व्यवसाय सुरू  करणार आहोत तिथं किती मसाले उद्योग  पूर्वी पासून कार्यरत आहेत याची माहिती काढणे आवशक असते .
  2. आपण आपली मसाला ब्रॅंड ची विशेषतः ठरवावी , आपण काय वेगळपणा ठेवणार आहोत ज्यामुळे ग्राहक आपल्या व्यवसाय कडे आकर्षित होतील त्याचा विचार केला पाहिजे.
  3. आपल्या भागात किंवा जवळपास किती व्होलसेल मसाले दुकान आहेत किंवा त्या संबंधित सामग्री ची दुकान आहेत त्याची माहिती असं गरजेचं आहे.
  4. आपण आपल्या मसाला उत्पादनाचा भाव/दर  ठरवताना बाजार भाव काय भाव सुरू  आहे इत्यादी गोष्टींचा विचार करून भाव / किंमत ठरवावी.
  5. मसाला चे प्रकार कोण कोणते आहेत त्याची माहिती असणं गरजेचं आहे.
  6. मसाला उद्योग प्रशिक्षण केंद्र कुठे आहे ते माहिती असले  पाहिजे.

 

मसाला उद्योग चालू करण्यासाठी काही महत्वाच्या पायऱ्या आपण समजून घेऊ ते पुढीलप्रमाणे :
प्रशिक्षण सर्वात प्रथम आपल्याला मसाला उद्योग सुरु करण्याआधी मसाला बनविण्याचे योग्यरीत्या प्रशिक्षण घेणे अत्यंत गरजेचे आहे . मसाले चे प्रकार किती , कोणते आणि ते कसे बनवायचे त्याच योग्यरीत्या प्रमाण कास समजून घ्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मसाले बनवून झाल्यावर त्याची गुणवत्ता कशी तपासून बघायची ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मसाला उद्योग सुरु करण्या आधी करण अत्यंत गरजेचे आहे.
नियोजन कोणतेही काम असो किंवा व्यसाय काही करण्याआधी त्याचे नियोजन करण करण अत्यंत  आवश्यक आहे . सर्वप्रथम तुम्ही नियोजन करा कि आपल्याला एकूण किती मसाले चा व्यवसाय चालू करायचा आहे . तो निवडून आपल्याला तो उत्तमरीत्या जमेल का ह्या सगळ्या प्रश्नाची पडताळणी करून झाल्यावर त्याचे व्यवस्थित नियोजन करा.
आवश्यक असणारी सामग्री आपल्यला कोणती सामग्री लागणार आहे जसे कि , ५० ग्रॅम मसाले बनविण्यासाठी किती साहित्य लागणार आहे. १०० ग्रॅम साठी किती साहित्य लागणार आहे इत्यादी सर्वाचा अभ्यास , मोजमाप समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ऊत्तम दर्जाची अशी सामग्री घ्या आपल्याला कोणत्या स्थानिक ठिकाणी त्याची विक्री करायची आहे ते ठरवून , तिथल्या मागणी नुसार नियोजन करा.
कामगार निवड आणि त्यांचे नियोजन संपूर्ण नियोजन करून झाल्यावर कामगार किती रुजू करायचे त्याच नियोजन करा . सुरुवातीला नफा च्या दृष्टीने शक्य तितका स्वतःला झोकून द्या किती मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवायचे आहे ह्याच्या दृष्टीने अनुभव असलेले किंवा मसाल्यांबद्दल थोड्याफार प्रमाणात माहिती असणार कामगार ची निवड करा जेणेकरून आपल्याला त्यांना प्रशिक्षण देण्यात आपला वेळ खर्ची घालवता येणार नाही . कामगारांची कामाची गुणवत्ता ओळखून त्यांच्या कामाचे नियोजन करून कामाची विभागणी करा.कोणतेही काम व्यवसाय हे प्रत्येकाची गुणवत्ता ठरवून कामाची विभागणी केल्यास ते काम लवकर पूर्ण होत आणि योग्य सरळ मार्गानेच पूर्ण होत.
भांडवल आपला व्यवसाय सुरु करण्याच्या वेळी आपल्याला भांडवल बद्द्दल तीन प्रश्नाचं विचार करून त्याचे उत्तर आपल्याकडे आहे का ह्याचा विचार करूनच पाऊल पुढे टाकावे.

 

 

१] आपण ह्या व्यवसायाकरिता किती भाडंवल राखून ठेवले आहे ?

२] आपल्याला ह्या व्यवसाय सुरु करण्याकरिता करिता किती भांडवल  खर्ची होणार आहे  ?

३] अडीअडचणीला आपण राखून ठेवलेल्या भांडवल मधूनच तोडगा काढू शकू का ?

असं म्हणतात व्यवसाय मध्ये चढ उतार असतात , ठराविक असा पैसा येत नाही . पण मला वाटत जर आपण नीट अभ्यास करून , अनुभव घेऊन आणि सगळ्या गोष्टीच योग्य रित्या प्रशिक्षण घेऊन काम केली कि सगळं हे व्यवस्थित होत . ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे संयम तो आपल्यामध्ये राखून ठेवणं खूप गरजेचं आहे.

मार्केटिंग : मसाल्यांचे उत्पादन केल्यानंतर , सगळ्यात महत्वाचं मुद्दा म्हणजे मार्केटिंग . आपल्याला आपल्या व्यवसायाची मार्केटिंग योग्य रित्या करता आली पाहिजे .आपण मार्केटिंग साठी कोणत्या कोणत्या माध्यमांचा वापर करणार आहोत हे समजून घेतलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे .

आपल्याला योग्य सल्लागार आणि व्यवस्थित रित्या नियोजन आखण्याची अत्यंत आवश्यकता आहे . तसेच स्थानिक , अथवा आंतरराष्ट्रीय बाजारावर आपला मसाला उत्पादन चा व्यवसाय कसा मोठ्या प्रमाणावर टिकेल आणि विकसित होईल ह्या ध्येयाचा विचार करून नियोजन करा .

मसाला उद्योग मध्ये योग्य नियोजन , व्यवस्थापन , उत्पादनाची विशेषतः आणि गुणवत्ता टिकून ठेऊन योग्य नियमांचे पालन करून व्यवसाय केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी उद्योजक बनू शकता.

मित्रांनो , या लेख मध्ये आम्ही मसाला उत्पादन बद्दल माहिती दिली आहे जसे कि ,  मसाला उत्पादन व्यवसाय  काय आहे , त्याची सुरुवात कशी करायची , त्याची नोंदणी प्रक्रिया कशी आहे , मसाला उत्पादन व्यवसाय सुरु करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार करावा इत्यादी.

 

धन्यवाद !

 

also read

chicken soup : उपचार शक्ती तथ्य आणि कल्पना ?

 

Leave a Comment

ram mandir pranpratishta ram mandir ayodhya
ram mandir pranpratishta ram mandir ayodhya