ram ji ki aarti : राम मंदिर निर्माण ते राष्ट्रनिर्माण

अयोध्या:

आज भगवान श्री राम यांचे अयोध्येतील मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला .त्या निमित्ताने ram ji ki aarti पठन करून मूर्ती पूजा करण्यात आली .

पंतप्रधान मोदी समवेत देशातील असंख्य मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते .

11 दिवसाचे उपवास केल्यानंतर श्री मोदी यांनी आज सोहळ्याला उपस्थिती लावली .

 

ram ji ki aarti
ram ji ki aarti

या निमित्ताने देशातील बहुतांश शाळा कॉलेज तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती .

यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. राम मंदिर पुन्हा होणं ही एक मोठा तप असल्याचे मोदींनी म्हटले.

तर भेदाभेदीची  मानसिकता तोडून संपूर्ण राष्ट्र उभं राहिलं. मी यावेळी दैवी अनुभव घेत असून . ज्यांच्या आशीर्वादाने हे काम पूर्ण झालं आहे, ते दिव्य परमात्मा आपल्या आसपास आहेत. मी या भव्य दिव्य चेतनेलाही नमन करतो.

मी आज भगवान प्रभू श्रीरामांकडे क्षमा, याचनाही करत आहे. आमच्या त्याग आणि तपश्येत काही तरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच इतकी शतके आपण हे काम पूर्ण करू शकलो नाही.

 

ram ji ki aarti साठी  कोण कोणते मान्यवर उपस्थित होते 

देशभरातून दिग्गज मंडळी या ram mandir सोहळ्यासाठी हजेरी लावली होती.

अभिनेते अमिताभ बच्चन , अभिषेक बच्चन , अभिनेते रजनीकांत , अभिनेते चिरंजीवी , विकी कौशल ,कतरीना कैफ समवेत

बॉलीवुड मंडळींनी हजेरी लावली होतीर

तसेच  रिलायन्स ग्रुप चे सर्वेसर्वा मुकेश अंबानी , नीता अंबानी मुलगा आकाश अंबानी समवेत उदोग्यपती उपस्थित होते .

या सोहळ्याला क्रिकेटपटूनीही आवर्जून हजेरी लावली होती .

सर्वांनी प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले ,

राम मंदिर निर्माण ते राष्ट्र निर्माण

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी जनतेला संदेश देत राम मंदिर तयार झाले असून

यातून राष्ट्र निर्माण होण्यास प्रभू श्री राम आपल्याला शक्ति देतील असेही ते म्हणाले .

त्याच बरोबर सर्वांनी प्रभू श्री रामाचा आदर्श घेऊन जीवन जगावे असेही त्यांनी संगितले .

आज ही उणीव भरून निघाली आहे. मला विश्वास आहे, भगवान प्रभू राम आज आपल्याला आवश्य क्षमा करतील, असेही मोदी यांनी म्हटले.

 

ram ji ki aarti मराठीत आपण भगवान श्री रामाची आरती बघूयात 

 

|| श्रीरामाची आरती ||

श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम

आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

श्रीराम जयराम जय जय राम

श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ धृ ॥

कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।
कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।
मारुती हा पुढे उभा हात जोडून ।
मारुती हा पुढे उभा हात जोडून ॥ १ ॥ राम ।

श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

भरत शत्रुघन दोघे चवर्‍या ढाळीती ।
भरत शत्रुघन दोघे चवर्‍या ढाळीती ।
सिंहासनी आरुढले जानकीपती ।
सिंहासनी आरुढले जानकीपती ॥ २ ॥ राम ।

श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।
लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ॥ ३ ॥ राम ।

श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
आता मागणे हेची ।
विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ॥ ४ ॥ राम ।

श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

 

त्रिभुवनमंडितमाळ गळां।
आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण।
मारुती सन्मुख उभा कर जोडून॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती।
स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी।
आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी॥

 

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें।
आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें॥

श्रीराम जय राम जय जय राम।
आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

also Read

zero hour in parliament : भारतीयांना माहितीच असावा …आत्ताच वाचा !

Leave a Comment

ram mandir pranpratishta ram mandir ayodhya
ram mandir pranpratishta ram mandir ayodhya