talathi bharti result:तलाठी भरती निकाल जाहीर !

मुंबई :

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) talathi bharti 2023 संवर्गातील पदाची  एकूण ४३४४ पद भरतीसाठी 

राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर  ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती .

महाराष्ट्र राज्याचं सर्वांगीण विकास करणाऱ्या सरकारी प्रक्रियांमध्ये एक महत्वाचे  अंग असलेल्या

‘तलाठी’ पदाचा निकाल (गुणवत्ता यादी ) लावण्यात आला .

राज्य सरकारने  खाजगी कंपनी सोबत  घेतलेल्या परीक्षेचा निकाल (गुणवत्ता यादी ) जाहीर करण्यात आला .

Normalisation प्रक्रियेनंतर हा निकाल (गुणवत्ता यादी ) जाहीर करण्यात आला आहे .

 

talathi bharti 2023
talathi bharti 2023

 

talathi bharti result तलाठींचं काम कस असतं 

तलाठींचं काम मुख्यतः ग्रामीण भागात गाव पातळीवर  केलं जातं.

तलाठ्याच्या कार्यालयास सज्जा असे म्हंटले  जाते .

सात बारा काढणे ,विविध प्रकारचे दाखले जसे की जात प्रमाणपत्र , नमूना क्रं 8

इत्यादी प्रकारची नोंद ठेवणे असे काम तलाठी पदाचे (talathi bharti 2023) असते .

त्याचप्रमाणे  गावांतील विविध सरकारी कामांसाठी जबाबदारी तलाठी पदाला दिली जाते .

 

talathi bharti result नियुक्ती कधी ?

नुकताच जाहीर झालेला तलाठी भरती निकाल (गुणवत्ता यादी ) थोडा उशिराने लागल्याच बोललं जात आहे .

त्यातच लोकसभेच्या निवडणूकमुळे नियुक्ती देण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो .

सरकारने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापर्यंत सर्व उमेदवार यांना नियुक्ती पत्र देण्याचे ठरवले आहे .

 

talathi bharti result : तलाठी पदाला वेतन किती मिळतं 

महाराष्ट्र राज्य सरकारने तलाठी पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना एकूण  25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रती माह  वेतन मिळते.

यासोबतच त्यांना महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले मूळ वेतन आणि इतर भत्ते

जसे की डीए ,पीएफ भविष्य निर्वाह निधि ,पेंशन (2005 नंतर ची नवीन पेंशन योजना ) आणि इतर लाभ मिळतात.

एमपीएससी करण्यार्‍या उमेदवारांची आवडती पोस्ट तलाठी असल्याच म्हंटलं जातं .

पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेरघर असलेल्या ठिकाणाहून बहुतांश विधार्थी तलाठी परीक्षेला बसतात .

एमपीएससी करणार्‍या ज्या उमेदवारांना अधिकारी होता आल नाही त्यांसाठी तलाठी पद म्हणजे यशाची पायरी समजली जाते .

तलाठी पदावर रुजू झालेला व्यक्ति निवृत्ती पर्यन्त नायब तहसिलदार व तहसिलदार पर्यन्त मजल मारू शकतो .

 

talathi bharti result : निकाल कुठे पाहाल.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिकृत www.mahabhumi.gov.in

संकेतस्थळावर आपण निकाल  पाहू शकता . गुणवत्ता यादी नंतर वरील वेबसाइट वर निकाल पाहू शकता .

तसेच राज्यातील 36 जिल्हया निहाय उमेदवारांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असे समजते .

 

Also read:

https://www.newsmaza.in/zero-hour-in-parliament/

1 thought on “talathi bharti result:तलाठी भरती निकाल जाहीर !”

Leave a Comment

ram mandir pranpratishta ram mandir ayodhya
ram mandir pranpratishta ram mandir ayodhya